Tuesday, August 28, 2012

Kakasparsha

Mahesh Manjrekar breaks new ground with his dream project, Kakasparsh. This tenderness with which Manjrekar interlaces human emotions to weave a fabric of love and warmth is indeed admirable. 
 Kakasparsh, Manjrekar’s magnum opus and labour of love, is a must-watch venture, one that you do not want to miss.

Set in the pre-Independence era, the movie showcases the social values prevalent at the time and deftly handles the myriad subtleties of human nature: love, promises, ethical values, morals, sacrifice...

The story revolves around a Brahmin family that resides in a small, picturesque hamlet in the Konkan of the 1930s.

Haridada Damle (Sachin Khedekar) is the head of the family who has successfully shouldered all his responsibilities after his father’s demise. When Mahadev, Haridada’s younger brother, is about to obtain a law degree, he arranges his wedding with Durga (Ketaki Mategaonkar), renamed Uma by her husband, who is just 13 at the time.

But Fate intervenes. Tragedy strikes the Damles soon after the wedding, as Uma is widowed the very day she marries Mahadev. In the 1930s, women had even fewer rights than they do now and a young widow had to lead a life devoid of all colour and joy.

However, Haridada remains rock solid and stands by Uma. He is steadfast in his resolve to keep her (Priya Bapat plays an elder Uma) in the Damle family. In doing so he has to fight social mores, peer compulsions and familial pressures.

His family and other villagers begin to question his intentions. Haridada’s wife, Tara (Medha Manjrekar), while on her death bed, asks him to marry Uma. But after a shocking incident Haridada is forced to take some hard decisions that rattle Uma leaving her disheartened.

When things begin to spiral out of control, Haridada has no option but to disclose the truth about his rebellious behaviour.


Kakasparsh literally means the ‘touch of a crow’. It refers to the belief that if a crow touches the pinda – a ball made of rice, etc and offered to crows when someone dies -- it signifies that the departed soul would rest in peace.

So what is the truth that shocks the family and the viewers alike? Does the society and Uma accept his truthfulness?

Kakasparsh answers these and many more questions as the audience finds itself riveted to their seats for the entire duration of the movie as it unfolds languidly before it.

It’s a film with such distinct and beautifully crafted characters that they will stay with you long after the movie has ended.

Usha Datar’s touching story has come alive on screen through Girish Joshi’s screenplay and dialogues. Director Mahesh Manjrekar knows what he wants to show and so does his excellent team of actors.

Though essentially this is Uma’s story, it eventually becomes the story of Haridada. The Damle family has one more female: Haridada’s widowed aunt, Namu atya (Savita Malpekar), who’s been tonsured according to the custom of the time when widows were forced to have a bald head.

Though not the protagonist, she plays an equally important role in the movie, a role which Savita has performed exceptionally well.
Sachin Khedekar is at his best, as is Priya. She shows her abundant acting talent as Uma in a role that changes with growing age. Ketaki has done well too but she looks little older than what the character demands.

Upadhyaya (Vaibhav Mangale) and Balwant (Sanjay Khapre) are two other characters that help keep the story moving. The poem ‘arey sansar sansar’ cited twice in the movie seems a bit out of context.

The characters’ costumes and the make-up fit the 1930s quite well, except for the finely carved eyebrows of females.

Rahul Ranade has done a good job in adapting the folk song. The two songs penned by Soumitra are very creative, too.

Kakasparsh has other plus points. The cinematography by Ajit Reddy, Rahul Bhatankar’s editing, Ajit-Sameer’s background score, the locations, the lighting all add up to make it a wonderful viewing experience.
In a nutshell, Kakasparsh offers you time travel into the pre-Independence era even as the lives of people in rural Maharashtra then reach out to touch you with a softness that is poignant and emotive 

Friday, August 24, 2012

Masala movie review

Failure and discouragement are the surest stepping stones to success, and a never-say-die attitude only adds to the sweetness of one's triumph. Marathi film, Masala, has been lovingly crafted with that optimistic theory as its basic premise.

Girish Kulkarni, who recently won 2 National Film Awards for his Marathi film, Deool, is the central character in Masala (a blend of spices). The film has been inspired by the life and times of Hukumchand Chordia, founder of Pravin Masalewale, a leading Indian brand of spices.

Revan (Girish Kulkarni), a young 'entrepreneur' full of the buoyancy that is the very essence of hopefulness, believes in keeping on trying till he succeeds. In spite of being waylaid by Fate and with only a string of business failures to show on his resume, Revan keeps chasing his dreams, never letting disappointment be a hurdle.

But his constant business fiascos lead to an increasing list of irate creditors, and he has to find newer ways and excuses to escape them. To avoid these creditors who are baying for his blood, Revan has to frequently skip from one town to another.

In his journey across Maharashtra, he is accompanied by his loving wife Sarika (Amruta Subhash), who fully supports all his business ventures and endeavours. By some quirk of fate, Revan finds himself in Solapur where he again starts a business with his brother-in-law.

So does Revan finally succeed in his so-called entrepreneurship? Where does his quest finally stop? Does he finally return triumphant because of his optimism? Is he able to build a foundation with the bricks that luck, or the lack of it, has thrown at him?

These are the very questions that this fine film seeks to answer as it makes you a part of Revan's life and journeys along which he comes many colorful and vibrant people.

From each of these strangers that he meets, he gets a ray of hope that helps him shape his own identity and character.

The cast of the movie includes Jyoti Subhash, Shrikant Yadav, Gargi Phule-Thatte, among others.

First time director Sandesh Kulkarni has brought together three veterans of Marathi theatre - Dr Shriram Lagoo, Dr Mohan Agashe and Dilip Prabhavalkar -- in Masala. And though Lagoo only has a guest appearance, Agashe and Prabhavalkar have impressive roles.

The film would have been incomplete without another couple, Kalyan and Sumati (played by Hrishikesh Joshi & Sneha Majgaonkar), who are Revan's co-travellers.
As the title suggests, Masala is all about a perfect blend of people doing perfect jobs, adding to the spice of life and making it that much more enjoyable.

The movie's songs blend with the story beautifully. Umesh Kulkarni, who directed brilliant films like Valu, Vihir and Deool, this time chooses to be the producer, offering the director's chair to Sandesh Kulkarni.

Sandesh has done a pretty good job in his directorial debut. The film slows down a bit after the interval, but soon gets back on track.
Besides acting in the movie, Girish Kulkarni (Revan) has also written the story, the screenplay and the dialogues for the film.

Amruta Subhash is brilliant as Sarika and does her job with aplomb. The on-screen chemistry between Girish and Amruta alone makes the film watchable.
To cut a long story short, if Maharashtra wants to bring in more National Film Awards, then films like Masala are needed to break the language barrier and win an all-India audience.

Masala is being released in 175 theatres all over Maharashtra; with about 450 screenings every day.

भारतीय? म्हणजे नक्की काय?


भारतीय? म्हणजे नक्की काय? आपण केवळ भारतात राहतो म्हणजे भारतीय आहोत? एक भारतीय म्हणून आपल्याला मिळाल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी मिळतात का आपल्याला सहज? हो, मोबाईल मिळतो आरामात. (कदाचित खूप गरीब असलात तर आता मोफतही मिळेल) पण रोज पुरेशी वीज आणि पाणी मिळतं का? आणि आपल्याच देशात आपली अवस्था अशी का? असे अनेक प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतात पण आपण  ‘अरे असंच चालणार रे या देशात’ असं म्हणत टेबलवर बसून चहाच्या घोटाबरोबर हे प्रश्न गिळून टाकतो.
       असाच एक प्रश्न आपल्यासमोर मांडला गेलाय, देविशा फिल्म्सची कलाकृती असलेल्या ‘भारतीय’ या सिनेमातून. ग्लोबल होऊ पाहणार्‍या भारतातल्या, लोकलही नसलेल्या ‘अडनिडं’ या एका नखभर खेड्याची ही गोष्ट. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरंचं हे खेडं. घर का ना घाट का अशी अवस्था असलेल्या आणि आपल्या नावाला जागणार्‍या या खेड्याला भारताच्या नकाशात स्थानच नाही. वीज, रस्ता, पाणी, शिक्षण अशा स्वतंत्र भारतात कमीतकमी अपेक्षा असलेल्या कुठल्याच गोष्टी या खेड्यात पोचलेल्या नाहीत पण मोबाईल मात्र आहे. हो रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे पण ती काय मिळते थोडी खटपट केली की. शाळेचा पत्ता नाही पण भारताचा स्वातंत्र्यदिन आला म्हणून प्रतिज्ञा मात्र सगळे पाठ करतायत. आणि मग त्यातल्या श्रीपतीला(जितेंद्र जोशी) प्रश्न पडतो की सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण भारतीय म्हणजे काय? याच प्रश्नाचं उत्तर शोधलं जातं ते या सिनेमातून.
       या सिनेमात मकरंद अनासपूरे वावरतो ते एका सूत्रधाराच्या रूपात. तोच चित्रपट सुरू करतो आणि तोच संपवतो. हेळवी ही मकरंदने साकारलेली भूमिका म्हणजे त्याच्या आत्तापर्यंतच्या भूमिकेंपेक्षा खूप वेगळी आहे. हेळवी म्हणजे गावागावात आपल्या नंदीसह फिरून वंशावळी लिहिणारी जमात. ज्या गावांचा इतिहास कुठेच लिहिला गेला नाही त्याची या हळवींना मात्र खडानखडा माहिती असते. आणि गरजेपूरतं वेळप्रसंगी ते गावाचं भविष्यदेखील वर्तवू शकतात. गावात वर्षानुवर्षे चालत आलेली सरदेशमुखी याच्यावर लोकं समाधानी आहेत पण त्याउलट गावातल्या लाडे पाटलाला (कुलदीप पवार) मात्र गावात ‘डेमॉक्रशी’ आणून स्वतःला सरपंच व्हायचंय. आधी म्हटल्याप्रमाणे गावाची नोंद कुठेच नसल्यामुळे खरं तर हे सरदेशमुखही (डॉ.मोहन आगाशे) गावात काही पिढ्यांपूर्वी येऊन राहिलेले उपरे कुटुंब आहे. पण हे तेव्हा लक्षात येतं जेव्हा मूळ सरदेशमुखांपैकी एक असलेला अभय सरदेशमुख (सुबोध भावे) अनेक पिढ्यांनंतर गावाला भेट देण्याचं ठरवतो. सरदेशमुखांना कधीच न लाभलेली प्रॉपर्टी म्हणजे सरदेशमुखांचा वंशपरंपरागत वाडा अभय विकायचं ठरवतो पण अनेक कचेर्‍यांच्या अनेक फेर्‍या घालूनही वाड्याची सात-बाराच्या उतार्‍यासारखी कागदपत्रं कुठेच उपलब्ध नसतात. शेवटी हताश झालेल्या एका क्षणी हळीव त्याला सरदेशमुखांचा आणि अडनिड गावाचा इतिहास सांगतो. त्यामुळे आईने आणि सरदेशमुख कुटुंबातील प्रत्येकाने अनेक वेळा मनाई करूनही, वर्षानुवर्षे बंद असलेलं वाड्याचं तळघर अभय उघडतो. आणि त्या तळघरात असं काही सापडतं की ज्यामुळे इतिहासाने स्वीकारलं पण भूगोलाने नाकारलं अशी अवस्था असलेलं हे अडनिडं मिडीयासकट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. स्थानिक म्हणूनही न गणलं गेलेलं गावातलं राजकारण बघता बघता जागतिक बनतं, सगळा देश ढवळून काढतं.  पण हे सगळंच इथे सांगण्यात मजा नाही कारण ही ढवळाढवळ पडद्यावर आवर्जून बघण्यासारखी आहे.
                अभयच्या या सुरूवातीला वेडेपणा म्हणून गणल्या गेलेल्या कामात त्याच्या कायम पाठीशी उभी राहतात ती दोन माणसं. एक म्हणजे गावातील एकमेव सरकारी नोकर महिपती (ऋषिकेश जोशी) आणि सरदेशमुखांची कोल्हापूर पुण्याकडे जाऊन शिकून आल्यामुळे स्मार्ट झालेली मुलगी सुगंधा (मिता सावरकर). (तरीदेखील ती काही मोजकीच वाक्यं अशुद्ध मराठीत का बोलते ते समजत नाही). चित्रपटात कथेच्या ओघात अनेक पात्रं येतात पण सुबोध, डॉ. आगाशे, कुलदीप पवार आणि मकरंद सोडल्यास बाकीच्यांना स्वतःची खास अभिनयक्षमता दाखवण्याची फारशी संधी या सिनेमात नाही. तरीदेखील प्रत्येकाने आपली कामं प्रामाणिकपणे केली आहेत. चित्रपटातली गाणी चांगली आहेत पण आवर्जून परत परत ऐकल्याशिवाय आवडणार नाहीत. अजय-अतुल आपली फारशी जादू या सिनेमात दाखवू शकलेले नाहीत. त्याचप्रमाणे सिनेमातील चार गाण्यांपैकी तीन गाणी आवर्जून अमराठी गायकांना गायला देऊन त्यांनी विशेष काही साधले आहे असे वाटत नाही. सगळ्यांनी गाणी अप्रतिम गायली आहेत याबद्दल दुमत असणार नाही पण अजय-अतुलचा अनेक चित्रपटापांसूनचा मराठी गाण्यांसाठीचा अमराठी आवाजाचा हट्ट कळत नाही. मराठमोळं पारंपारिक चालीतलं ‘बघ उघडूनी दार अंतरंगातलं देव गावंल का?’ हे भजन रूपकुमार राठोडजींच्या आवाजात खटकतं. उलट ते गाणं स्वतः अजयने गायला हवं होतं असं वाटल्याशिवाय रहात नाही. फक्त ते गाणं चित्रपटात ज्या प्रसंगी येतं तो प्रसंग खूप परिणाम साधून जातो. या सगळ्याला अपवाद फक्त नंदेश उमपने खणखणीत आवाजात गायलेल्या पोवाड्याचा. या सिनेमाच्या निमित्ताने कवी संदीप खरेने पहिल्यांदाच अजय-अतुल बरोबर गीतकार म्हणून काम केलं आहे. त्याने लिहिलेलं ‘युगे युगे आहोत इथे तरी आम्ही व्हॅलिड आहोत अनं आमचं केव्हाच ठरलंय अवं आम्ही लई सॉलिड आहोत’ हे गाणं टिपिकल संदीप छाप आहे.
       चित्रपटाचा मूळ पाया असलेली कथा-पटकथा आणि संवाद चांगले असतील तर अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते असं म्हणतात. तशी एक अनिरूद्ध पोतदार यांनी लिहिलेली चांगली कथा या सिनेमाला मिळाली आहे.. संजय पवारांचे संवाद खटकेबाज आहेत. दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी याआधी ही पोरगी कुणाची या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे, ज्याला फारसे यश मिळाले नव्हते. पण या सिनेमात मात्र त्यांच्या दिग्दर्शनातली परिपक्वता जाणवते. भारतीयची ही कथा सीमाप्रश्नांशी निगडीत असली तरी त्यात सीमावादावर कोणतेही भाष्य नाही असे दिग्दर्शक स्वतःच म्हणतात.
‘भारतीय’ एकाचवेळी १८५ चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून पुढच्या महिन्यापासून भारताबाहेरही रसिकांसाठी प्रदर्शित केला जाईल.
मुळचे तंत्र उद्योजक असलेल्या अभिजीत घोलप यांनी देविशा फिल्म्सची स्थापना करून एक अत्यंत चांगले पाऊल उचलले आहे. त्यांची पहिली निर्मिती होती ‘देऊळ’ ज्या सिनेमाने तीन राष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच अनेक सन्मान मिळवले. आणि आता त्यांची दुसरी निर्मिती आहे ‘भारतीय’. एक चांगला सिनेमा बनण्यासाठी लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेत्यांबरोबरच चांगला निर्माता मिळणंही तितकंच आवश्यक असतं तरच एक सुबक कलाकृती तयार होते हे हा सिनेमा बघताना नक्की जाणवतं.
                                                                                                               
              

Thursday, August 23, 2012

चिंटू - चित्रपट परीक्षण


चारूहास पंडीत आणि प्रभाकर वाडेकरांचं काल्पनिक अपत्य असलेला चिंटू खरं तर आता २१ वर्षांचा आणि सज्ञान झालाय पण तो आपल्याला वर्तमानपत्रातील हास्यचित्रमालिकेतून भेटणारा चिंटू..पण हाच चिंटू आणि त्याची गॅंग खास मे महिन्याच्या सुट्टीत मुलांना भेटायला मोठ्या पडद्यावर अवतरली आहे
 फेसबूकवरून मित्र जमवण्याचा आणि मैदानी खेळ व्हर्च्युअल पद्धतीने खेळण्याचा आजचा जमाना. त्यामुळे चिंटू व त्याची मिनी, बगळ्या, नेहा, पप्पू, सोनू आणि राजू ही मित्रमंडळी यांनी चित्रपटात घातलेला धुडगूस पाहायला मुलांना नक्कीच धमाल येईल.
तशी चिंटू या हास्यचित्रमालिकेला स्वतःची अशी काहीच कथा नाही त्यामुळे त्याचा चित्रपट तयार करताना त्याभोवती एक काल्पनिक कथा गुंफणे जरूरीचे होते. ते काम केले आहे विभावरी देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले यांनी. चिंटू व त्याची मित्रमंडळी ही शहराच्या उच्च मध्यमवर्गीय भागात राहणारी आहेत. त्याच्या या गँगची परिक्षा नुकतीच संपलेली असते आणि सुट्टीमधले त्यांचे ‘उद्योग’ सुरू असतात. पण चिंटुच्या मनात मात्र वेगळंच असतं. त्यांना नेहमीच क्रिकेटमध्ये हरवणार्‍या ‘विंचु वॉरियर्स’शी यावर्षी काहीही करून मॅच जिंकायचीच असं तो त्याच्या सगळ्या गँगला सांगतो व सगळे मिळून बनतात ‘वानरवेडे वॉरियर्स’. क्रिकेट मॅचचा दिवस ठरतो आणि सगळयांचा सराव जोरात चालू होतो. चपळ शरीर, सकस आहार, व्यायाम, धावणे-पळणे काही विचारू नका. शेवटी एकदाचा मॅचचा दिवस उजाडतो. मॅच रंगात आली असताना आणि ‘वानरवेडे वॉरियर्स’ चक्क जिंकण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच एक भलतंच आणि अनपेक्षित विघ्न उभं राहतं. ती मॅच तशीच अनिर्णित राहते पण या समस्येमुळे सगळेच अस्वस्थ होतात. तसा या समस्येचा मुलांच्या आईबाबांना काहीच त्रास जाणवत नाही त्यामुळे त्यांच्याकडून याबाबत काहीच हालचाल होत नाही. शेवटी ‘ज्याचे जळते त्यालाच कळते’ या उक्तीनुसार मुले त्यावर स्वत:च उपाय काढायचा ठरवतात आणि या ‘विक्राळ’ समस्येचा फडशा पाडतात. काय असतं हे विघ्न आणि कसा होतो समस्येचा आणि मैदानावरचा खराखुरा सामना? हे दाखवायला तुमच्या मुलांना नक्की न्यायला हरकत नाही.         
मराठीमध्ये अनेक काळानंतर आणि तोही हास्यचित्रमालिकेवर पहिल्यांदाच बालचित्रपट निर्माण झाला आहे. आयएमई मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीरंग गोडबोलेंनीच केले आहे. चित्रपटाच्या निमित्ताने बर्‍याच दिवसांनी पुन्हा एकदा संदीप-सलिल ही जोडी निरागस बालगीते घेऊन लोकांच्या समोर आली आहे. चिंटुसाठी पार्श्वगायन केलं आहे ते सलीलचा मुलगा शुभंकर कुलकर्णी याने. गाणी लहान मुलांना आवडतील आणि मोठ्यांनाही गुणगुणावीशी वाटतील अशी नक्कीच आहेत.. चिंटुचा खट्याळ आणि निरागसपणा चेहर्‍यावर आणि अभिनयात दाखवण्यात शुभंकर अत्रे कुठेही कमी पडत नाही. त्याचबरोबर मिनी (सुहानी धडफळे), नेहा (रुमानी खरे), बगळ्या (अनिमेश पाध्ये), राजु (वेद रावडे पप्पू (निशांत भावसार) आणि सोनू (अर्जुन जोग) यांची निवडही योग्य ठरते. विंचु वॉरियर्सही छोट्याशा भूमिकेत असले तरी आवडून जातात. विभावरी देशपांडे, सुबोध भावे, श्रीराम पेंडसे, विजय पटवर्धन, ओम भूतकर, नागेश भोसले, दिलिप प्रभावळकर आणि भारती आचरेकर यांच्या भूमिका चित्रपटाला आधार देतात. पण जास्त लक्षात राहतो तो अतिशय नैसर्गिकरित्या अभिनय करणारा सतीशदादा(आलोक राजवाडे) आणि कर्नलच्या छोट्याश्याच भूमिकेत असणारे पद्मश्री सतिश आळेकर.
       चित्रपटामध्ये आवर्जून लक्ष जाते ते सर्व कलाकारांच्या वेशभूषेकडे. सिनेमात एक व्यक्तिरेखा एकाच डिझाईनचे कपडे परिधान करते फक्त त्याचे रंग बदलत राहतात. अगदी चिंटुची आईदेखील याला अपवाद नाही. सुरूवातीला ही गोष्ट डोळ्यांना खटकल्याशिवाय रहात नाही पण मग हा सिनेमा हास्यचित्रमालिका डोळ्यासमोर ठेवून बनवला गेला असल्याचे लक्षात आल्यावर त्या गोष्टीचा तसा त्रास होत नाही. गीता गोडबोले यांनी कलाकारांच्या वेशभूषेची जबाबदारी स्वीकारली आहे. पण त्यांनीच केलेली कलाकारांची रंगभूषा मात्र (विशेषत: विभावरी व सुबोधची) फारच भडक व हौशी रंगभूषाकाराने केल्यासारखी वाटते. आणि चित्रपटात लॉंगशॉर्ट्सचा अभाव असल्यामुळे ते जास्तच जाणवते. चिंटुची गृहिणी असलेली आई रात्री त्याला कुशीत घेऊन झोपतानाही तशीच चित्रातल्यासारखी मेक अप केलेली दिसेल हे पटत नाही. पण तुम्ही जर चित्रपट मूल म्हणून पाहिलात तर हे दोष तुम्हाला जाणवणारही नाहीत कारण सर्वच बालकलाकारांचा धमाल अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
एकूण काय तर मुलांना एकट्यांनाच सिनेमा बघायला पाठवलंत तर तुम्ही फार काही गमवाल असं नाही पण बरोबर गेलात तर तुमचं मागे पडलेलं बालपण निदान तेवढा काळ तरी तुम्हाला चित्रपटगृहाच्या अंधारात पुन्हा सापडेल.


जगण्याचा पाया चालण्याचे बळ


कुणीही संत म्हणून जन्माला येत नाही. संतपदाला तुम्हाला पोचवण्यात तुमच्या आयुष्यातील बारीकसारीक घटनांचा, जडणघडणीचा महत्वाचा वाटा असतो. दहा वर्षांचा एक अल्लड मुलगा ते संत परंपरेतील कळस ठरलेले संत तुकाराम महाराज हा जीवनप्रवास म्हणजे एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला ‘तुकाराम’ हा सिनेमा. आपल्याला तुकाराम महाराज माहित आहेत ते थेट संतपदाला पोचलेले. पण एकदम कुणी संतपदाला पोचत नाही.


तुका (पद्मनाभ गायकवाड) हा देहू गावी १६०८ साली जन्मलेला तुमच्या आमच्यासारखाच लहान मुलगा. मित्र जमवून दिवसभर विटी दांडू, लगोरी, सूर पारंब्या खेळत गावभर धुडगूस घालणारा आणि घरात वंशपरंपरागत वारीची परंपरा असल्यामुळे विठ्ठलाला आपल्यातलाच एक समजणारा.

 तुकारामाचे वडिल, वोल्होबा अंबिलेंचा (शरद पोंक्षे) सावकारीचा धंदा असल्यामुळे घरात श्रीमंती नांदत होती. त्यांची आई (प्रतिक्षा लोणकर) ही एक प्रेमळ आणि कर्तृत्ववान माऊली. वोल्होबाही पंढरीची वारी कधीही न चुकवणारे विठ्ठलभक्त, पण सावकारीचा व्यवसाय आणि देवभक्ती यात त्यांनी कधीही गल्लत केली नाही. तुकारामांचा मोठा भाऊ सावजी(वृषसेन दाभोळकर) याचे मात्र विठ्ठलाशिवाय कुठेच लक्ष नसते. अगदी लग्नाची बायको मंजुळाकडे(स्मिता तांबे) ते आयुष्यभर पहातदेखील नाहीत. त्यामुळे तुकारामांना लहान वयातच वडिलांच्या कारभारात मदत करीत कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागते. योग्य वेळ आल्यावर त्यांचे रखमेशी (वीणा जामकर) लग्न लावले जाते. पण रखमेच्या आजारपणामुळे तिला मूल होण्याची शक्यता नसते. ही परिस्थिती आणि घरच्यांची मने ओळखून रखमाच तुकारामांना(जितेंद्र जोशी) त्यांच्या मनाविरूद्ध दुसरे लग्न करायला लावते आणि त्यांची दुसरी पत्नी आवली(राधिका आपटे) घरात येते. पण सवतींमधला समजूतदारपणा आणि बहिणीसारखे संबंध घराला आधारच देतात. असे सगळे गुण्यागोविंदाने चालले असताना आणि घराची भरभराट होत असतानाच दुष्काळाची चाहूल लागते. पण दुष्काळाला घाबरून सावकाराला आपला धंदा सोडून चालत नाही या विचारानुसार नेमके याचवेळी वडिल तुकारामांना वसुलीला पाठवतात. तुकारामांच्या मनाला पटत नसूनही त्यांना वसुलीला जावे लागते. त्याचवेळी त्यांच्या वडिलांचे निधन होते व वसुलीच्या पापाचे वाईट फळ आपल्या कुटुंबाला मिळाल्याची जाणीव तुकारांमांना आत कुठेतरी होते. त्यानंतर अंबिलेंच्या घरावर दुःखाचे पहाड कोसळू लागतात व प्रत्येक दुःखातून होणारी दाहक अशा सत्याची जाणीव तुकारामांचे मन जाळीत जाते. बघता बघता होत्याचे नव्हते होते आणि सावकाराच्या घरात मृत्यु झाल्यावर बाराव्या-तेराव्याच्या निमित्ताने का होईना पण मिळालेल्या जेवणावर तुटून पडणारी आणि पुढच्या मृत्युची वाट पाहणारी दुष्काळी भूकेली माणसे पाहिल्यावर ते आपल्या घरातली धान्याची कोठारे गावापुढे मोकळी करतात. काही काळाने घरातील सावकारीचा धंदा आपला धाकटा भाऊ कान्हावर (विकास पाटील) सोपवून ते या सगळ्यातून निवृत्त होतात. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणत, अभंगरचना करत ‍दर्‍याखोर्‍यातून हिंडू लागतात. पण आवली त्यांना परखड शब्दात संसारकर्तव्याची जाणीव करून देते आणि ते पुन्हा संसाराला लागतात. देवाची अखंड भक्ती करता यावी म्हणून अंबिलेंच्या पारंपारिक देवळाचा जिर्णोद्धार करतात व भजन-प्रवचनातही रमतात. पण एका कुणबी वाण्याने अभंगरचना करावी हे त्याकाळच्या रूढी-परंपरेनुसार ब्राह्मणांना रुचणे शक्य नसते व मंबाजीच्या(यतिन कार्येकर) मदतीने धर्मपीठाकडून तुकारामांचा छ्ळ सुरू होतो. त्या छळाचे परिवर्तन नक्की कशात होते हा इतिहास जरी आपल्याला माहित असला तरी तो पडद्यावर कसा साकारला आहे हे पाहणे नक्कीच आनंददायी आहे.
      संजय छाब्रिया यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद हे अजित दळवी आणि प्रशांत दळवी यांनी लिहिले आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘बिनधास्त’ नंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. जितेंद्र जोशी तुकारामाच्या भूमिकेत चांगलाच एकरूप झालेला आहे आणि चित्रपटातील एक ना एक कलाकारांनी चित्रपट उत्तम बनवण्यासाठी मेहनत घेतली आहे. मूळात गायक असलेल्या पद्मनाभ गायकवाडच्या निरागस अभिनयाचे विशेष कौतुक करायला हवे.
अशा चित्रपटाचे संगीत करणे हे एक वेगळे आव्हान होते पण अवधूत गुप्ते आणि अशोक पत्की यांनी एकत्रितपणे ते उत्तम पेलले आहे. ‘गन्या मना तुका, संतु दामा पका, नका भांडू रामा पांडू, चला खेळू विटी दांडू’ या छोट्या तुकारामावर चित्रीत झालेल्या गाण्याने विशेष मजा आणली आहे. सारेगम स्पर्धेतील गायक ज्ञानेश्वर मेश्राम, अनिरूद्ध जोशी, जान्हवी प्रभू-अरोरा, पद्मनाभ गायकवाड आणि स्वत: अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. अवघ्या ४२ वर्षांच्या आयुष्यात तुकारामांनी ४५०० अभंगांचा खजिना निर्माण केला परंतु त्यातील निवडक अभंगांचा गरजेपूरताच आणि योग्य वापर या चित्रपटात केला गेला आहे. शिवाय कवी दासू यांचे काव्य कुठेही त्या काळाशी विसंगत वाटत नाही.
      महाराष्ट्राचे एक थोर संत एका नवीन रूपात आणि आजच्या काळाला अनुसरून असलेल्या सिनेमामाध्यमाद्वारे ७६ वर्षांनी पुन्हा एकदा चंदेरी पडद्यावर अवतरत आहेत. या निर्मितीमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होऊन आपणही पांडुरंगमय व्हायला काहीच हरकत नाही.
                        

Thursday, June 24, 2010